31 ऑक्टो. 2026, 21:36

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप
तरुण भारत

बेटीया शक्ती फाउंडेशन व जंगल प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑक्टोबर रोजी दिघोरी येथील गजानन प्रसाद उच्च प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत शिशुविहार ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅग, वह्या, पेन व पेन्सिल किट देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसह विनायक झाडे, भरत मुंडले, मनोहर पाटील, सुभाष पांडे, मुकुंद नाईकवाडे, राजेश समरीत, शंकर बाभरे, प्रमोद पिल्लेवार आणि मिलिंद गुल्हाने उपस्थित होते.

सौजन्य:अरविंद पाठक,संपर्क मित्र

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय