31 ऑक्टो. 2026, 20:38

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तरुण भारत

शहरातील एका परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फोन कॉल रेकॉर्डिंगच्या बहाण्याने धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आणि तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी एका ४५ वर्षीय किराणा दुकानदाराविरुद्ध पॉसो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रफुल साखरकर याचे किराणा दुकान आहे. पीडित मुलीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला दुकानात बोलावून घेतले. तिच्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगून ते कुटुंबीयांना ऐकवण्याची धमकी दिली आणि तिला धमकावून तिच्यावर दबाव आणला.पीडिता अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची तक्रार दाखल झाली आहे.एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत संशयिताने पीडितेला घरी तसेच किराणा दुकानात बोलावून हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी २५ ऑटोबर रोजी कारंजा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एल), ६४(२)(एम), ३५१(२) तसेच पॉसो कायद्याच्या कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करत आहेत.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय