१०२४ केंद्रांवरून झाली पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात रविवार २५ रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा जिल्ह्यातील १०२४ केंद्रांवरून घेण्यात आली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले निरक्षर व्यती वेळीच परीक्षा केंद्रांवर पोहोचले होते.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यतींना मूलभूत साक्षरता कौशल्ये प्रदान करणे हा आहे. यात वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये तपासली जातील. केंद्र शासनाच्या ‘उल्लास’ या कार्यक्रमांतर्गत ही परीक्षा घेण्यात येते. ज्यामध्ये निरक्षर व्यतींना केवळ साक्षर बनवणेच नाही तर त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये, जसे की आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती देणे हे देखील समाविष्ट आहे. सदर परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रविवारी जिल्ह्यातील १०२४ केंद्रांवरून घेण्यात आली. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी ३० मिनिटांचा अतिरित वेळ देण्यात आला होता. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ९१४ इतया असाक्षरांची नोंद उल्लास अॅपवर ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.
भारत विद्यालयातही गिरविले आनंदाचे धडे
हिंगणघाट : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत स्थानिक भारत विद्यालयात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक हरीश भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या सहभागाने या परीक्षेचे नियोजन व कामकाज यशस्वीरित्या पार पडले.या प्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरविंद राठोड यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी करीत उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या वर्गाला परिसरातील ज्येष्ठ महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वही-पेन हातात घेऊन, बेंचवर बसून त्यांनी आनंदाने धडे गिरवत चाचणी दिली. आयुष्याच्या या टप्प्यावर अक्षरांची ओळख करून घेताना त्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद हा खर्या अर्थाने प्रेरणादायी होता. प्रगती, सामर्थ्य आणि स्वप्नांना पंख देणारा हा उपक्रम म्हणजे शिक्षणाकडे टाकलेलं एक सकारात्मक पाऊल आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
