31 ऑक्टो. 2026, 18:33

tarunbharat

सर्च
तंत्रज्ञान

नववी ते बारावीसाठी आता ‘एआय’ अभ्यासक्रम

नववी ते बारावीसाठी आता ‘एआय’ अभ्यासक्रम
तरुण भारत

नवी दिल्लीनॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉम्प्युटेशनल थिंकिंग’ आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयांवर आधारित २० तासांचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. आयआयटी मद्रास, आयआयटी जोधपूर आणि एनसीईआरटीच्या तज्ज्ञांनी हा कृती आधारित अभ्यासक्रम विकसित केला असून विद्यार्थ्यांना एआयचे स्वरूप, फायदे-तोटे आणि सुरक्षित वापराचे धडे देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
कोणत्याही ‘एआय टूल’मध्ये आधार क्रमांक, पॅन कार्ड, पासवर्ड, ओटीपी किंवा खासगी कागदपत्रे यांसारखा संवेदनशील माहिती टाकू नये, अशी सूचना एनसीईआरटीने विद्यार्थ्यांना दिली आहे. तंत्रज्ञान वापरताना मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नैतिक जबाबदारी केंद्रस्थानी राहिली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल उपकरणे उपलब्ध नसतानाही शिकवला जाऊ शकतो. अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि पाच युनिटस्ची विभागणी विद्यार्थ्यांना एआय सिस्टीमवर आंधळेपणाने अवलंबून न राहता तिचे योग्य मूल्यमापन करता यावे, यासाठी पाच युनिटस् तयार करण्यात आली आहेत.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय