31 ऑक्टो. 2026, 19:55

tarunbharat

सर्च
राजकारण

मुख्यमंत्री रेखा गुप्ताकडून ५१ नवविवाहितांना लाखाची भेट!

मुख्यमंत्री रेखा गुप्ताकडून ५१ नवविवाहितांना लाखाची भेट!
तरुण भारत

नवविवाहित महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विशेष उपक्रम राबवला आहे. बुधवारी मुख्यमंत्री लोकसेवा भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५१ नवविवाहित महिलांना त्यांच्या पहिल्या करवा चौथनिमित्त प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश आणि करवा चौथ किट प्रदान केले. या सर्व महिलांचे विवाह मार्च महिन्यात लाडली फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात झाले होते.

नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व महिलांना पहिल्या करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची आणि वैवाहिक जीवनाची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला. महिलांनी आपले अनुभवही यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत महिलांनी घाबरून न जाता आपले विचार मोकळेपणाने मांडावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या जातील आणि त्या एकट्या नाहीत, असा विश्वासही त्यांनी दिला. महिलांनी आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करावीत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी आणि आयुष्यात प्रगती साधावी, असे प्रोत्साहनही रेखा गुप्ता यांनी दिले.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय