31 ऑक्टो. 2026, 18:22

tarunbharat

सर्च
जीवनशैली

वर्धा जिल्ह्यातील २.३८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच हजारांची अग्रीम मदत

शासन आदेश निर्गमित

वर्धा जिल्ह्यातील २.३८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच हजारांची अग्रीम मदत
तरुण भारत

यंदा अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी शासनाने ५ हजारांच्या अग्रीम मदतीचा आदेश निर्गमित केला आहे. जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ६५० खातेधारक शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच ५ हजारांची रक्कम जमा होणार आहे.

जिल्ह्यातील ७ तालुक्यांचा दुष्काळी ट्रिगर-१ मध्ये समावेश केल्यानंतर शेत पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळी ट्रिगर-२ मध्ये समावेश करण्यात आला. अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडाचा जिल्ह्यातील १३५४ गावांना फटका बसला असून २ लाख ३८ हजार ६५० शेतकरी बाधित झाले. संयुक्त पंचनाम्यांअंती जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार १३३.०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. संबंधित अहवाल १६ ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाने सादर केला. आता शासन स्तरावरून हवालदिल शेतकर्यांना ५ हजारांची अग्रीम मदत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी अन् नुकसान

तालुका : बाधित शेतकरी : ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र

वर्धा : ३२६५५ : ३६८९४.८० हेक्टर

सेलू : २७४९२ : २८६४३.६६ हेक्टर

देवळी : ३०६१९ : ३२३८५.४० हेक्टर

आर्वी : २६३७१ : ३२५६५.६९ हेक्टर

आष्टी : १७८४६ : १४१०२.४७ हेक्टर

कारंजा : २५२७१ : २७३६१.२३ हेक्टर

हिंगणघाट : ४०३८८ : ४९४१० हेक्टर

समुद्रपूर : ३८००८ : ४७७६९.७७ हेक्टर

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय