31 ऑक्टो. 2026, 18:43

tarunbharat

सर्च
जीवनशैली

फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
तरुण भारत

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआर मध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, न्यायालय फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नाही, तर याप्रकरणी एक संतुलित आदेश पारित केला जाईल.

सणांच्या काळात लोकांच्या उत्साहावर किंवा आनंदावर गदा आणण्याची न्यायालयाची मुळीच इच्छा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने फटाक्यांचे नियम मोडणाऱ्यांवर आणि अवैध विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. फटाके आणि प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अनोखा सल्ला दिला आहे. "नवीन पिढी आधीपासूनच फटाके आणि प्रदूषणाबाबत बऱ्यापैकी जागरूक आहे. मात्र, फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी विराट कोहलीसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला गेला पाहिजे," अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारने न्यायालयात आपले स्पष्टीकरण सादर करताना म्हटले की, सरकार वायू प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत गंभीर आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्लीत लवकरच बाहेरून येणाऱ्या BS6 वाहनांवर बंदी घालणे, सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करणे आणि स्मॉग गन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे यांसारखी कडक पावले उचलली जात आहेत.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय