31 ऑक्टो. 2026, 18:22

tarunbharat

सर्च
जीवनशैली

हावरा पेठमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी!

हावरा पेठमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी!
तरुण भारत

हावरा पेठ, गल्ली क्रमांक ७ येथे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गल्लीतील नागरिक व ग्रुप मेंबर्स एकत्र आले असून, सर्वांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण संवाद साधत उत्सवाचा आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हावरा पेठ गल्ली क्रमांक ७ मधील ग्रुप मेंबर्स सुनील दळवी, रोशन रणदिवे, गजानन मुडे, अनिल धूर्वे, हर्षद पटेल, दिनेश वैतागे, ॲड. अनिल कांबळे, गुणवंत ईखार, मकरंद फणसाळकर, चंद्रकांत रणदिवे, प्रकाश उमाठे, राहुल कुळकर्णी, सुनील दाणी, धनंजय भिडे गुरुजी आणि प्रशांत कामठे** यांच्यासह इतर सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

सर्व सदस्यांच्या एकजुटीने, सहकार्याने आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आपुलकी, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.एकजूट, सहकार्य आणि स्नेहभाव जपत कोजागिरी पौर्णिमेचा हा सोहळा आनंदात संपन्न झाला.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय