31 ऑक्टो. 2026, 19:53

tarunbharat

सर्च
जीवनशैली

बालाजी संस्थानच्या वार्षिकोत्सवास भक्तांची रिघ

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

बालाजी संस्थानच्या वार्षिकोत्सवास भक्तांची रिघ
तरुण भारत

दरवर्षी प्रमाणे श्री बालाजी संस्थानच्या वतीने वहिवाटदार विश्वस्त भवानीपंत ज्ञानेश्वर काळू यांच्या मार्गदर्शनात भव्य वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्यात आले होते.

या उत्सवासरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करर्‍यात आले होते, २४ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे वितरण झाले. तर २५ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथील हभप गणेशबुवा रामदासी यांचे राष्ट्रीय किर्तन झाले, २६ ऑक्टोबर रोजी हभप गणेशबुवा रामदासी यांचे रामदासी किर्तन, २७ ऑक्टोबर रोजी हिंगोली येथील हभप सर्वेश महाराज शुक्ल यांचे गोपाल काल्याचे किर्तन, सायंकाळी ५.४५ वाजता गोपाल काला व दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन वहिवाटदार अ‍ॅड. भवानीपंत काळू यांनी केले आहे.

छायाचित्र - वार्षिकोत्सवास उपस्थित भक्तगण

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय