31 ऑक्टो. 2026, 18:37

tarunbharat

सर्च
मनोरंजन

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर खास जुगलबंदी

माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याचं शर्वरी वाघचं स्वप्न अखेर पूर्ण

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर खास जुगलबंदी
तरुण भारत

आपल्या मनमोहक अदाकारीने, दिलखेचक नृत्याने आणि सहजसुंदर अभिनयाने अभिनेत्री माधुरी दीक्षितने अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही तिच्या नृत्याची जादू चाहत्यांना भुरळ घालते. आता माधुरीचा अभिनेत्री शर्वरी वाघसोबतचा एक खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘ये प्रेम मोल लिया’ या गाण्यावर दोघींनी केलेल्या नृत्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माधुरीसोबत डान्स करण्याचं शर्वरीचं स्वप्न पूर्ण

शर्वरी वाघने सोशल मीडियावर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. माधुरी दीक्षितसारख्या लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्रीबरोबर नृत्य करण्याची संधी मिळणं, ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं शर्वरीने व्यक्त केलं. माधुरीसोबत डान्स करण्याचं आपलं स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण झाल्याची भावना तिने या पोस्टमधून व्यक्त केली. दोघींच्या नृत्यातील तालमेल आणि त्यांच्या खास अंदाजाने चाहत्यांना आकर्षित केलं आहे.माधुरी आणि शर्वरीचा हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही या डान्सचं कौतुक केलं असून, अभिनेता आयुष्मान खुरानानेही व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. माधुरीचा अनुभवी नृत्याविष्कार आणि शर्वरीचा उत्साही अंदाज यांची जुगलबंदी चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

ये प्रेम मोल लिया’ चित्रपटाचीही चर्चा

दरम्यान, दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात शर्वरी वाघ आणि आयुष्मान खुराना एकत्र झळकणार आहेत. चित्रपटातील गाण्यांमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच माधुरी आणि शर्वरीच्या डान्स व्हिडीओने या गाण्याकडे आणि चित्रपटाकडे पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आता या चित्रपटातून शर्वरी आणि आयुष्मानची जोडी प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय