31 ऑक्टो. 2026, 20:39

tarunbharat

सर्च
मनोरंजन

झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस

झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस
तरुण भारत

प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एक नवं आव्हान समोर येतं. मात्र, आपल्या माणसांची साथ, स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर हीच आव्हानं यशाचा मार्ग दाखवतात. याच भावनेतून यंदाच्या 'झी मराठी अवॉर्ड्स 2026' ची संकल्पना आहे ‘चॅलेंज'. 'पाऊल पुढे पडलंय… जमलंय!' या भावनेतून साकार होणारा हा सोहळा. या खास सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मनोरंजन, नृत्य, धमाल आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेस!

सोहळ्याची सुरुवात होणार कलाकारांच्या दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्रीने! आपल्या आवडत्या मालिकांमधील कलाकार त्यांच्या खास आणि हटके पोशाखांतून लक्ष वेधून घेतील. प्रत्येक पोशाखात दिसणारी वेगळी कल्पना, आणि आकर्षक लूक रेड कार्पेटची रंगत वाढवतील. एवढंच नाही, तर मालिकांमधील कलाकार एकमेकांना देणार आव्हान! त्यामुळे कोणत्या मालिकेतील कलाकार बाजी मारणार आणि कोण ठरणार सर्वांत सरस, याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. यानंतर रंगणार प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेस! कमळी–ऋषी, सावली–सारंग, जान्हवी–विश्वा, भावना–सिद्धू, जय–शरू, तारिणी–केदार, समर–स्वानंदी, दीप - ज्योती आणि गौरी–शंकर या जोड्या आपल्या नृत्यातून प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गोडवा उलगडणार आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीसोबतच नृत्याची जुगलबंदीही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

झी मराठीच्या दमदार स्त्री व्यक्तिरेखा मंगळागौरीच्या पारंपरिक रंगात रंगणार आहेत. उत्साहाने भरलेल्या या सादरीकरणात मात्र अचानक एक अनपेक्षित आव्हान येणार आहे. त्यामुळे या धमाल परफॉर्मन्समध्ये पुढे काय घडणार, हे पाहणं मनोरंजक ठरेल. खलनायकांच्या खास सादरीकरणात प्रत्येक व्यक्तिरेखेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. त्यांच्या हटके अंदाजातून रंगणारा हा परफॉर्मन्स मनोरंजनात वेगळीच रंगत आणणार आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय