31 ऑक्टो. 2026, 18:37

tarunbharat

सर्च
अर्थकारण

दिवाळीच्या खरेदीत साखरेचा खर्च वाढणार?

दिवाळीच्या खरेदीत साखरेचा खर्च वाढणार?
तरुण भारत

दिवाळी तोंडावर आली असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसू लागलेला आहे. गोडधोड बनवण्यासाठी लागणाऱ्या साखरेचे भाव कडाडलेले आहे. पुण्यात फक्त दहा दिवसातमध्ये किरकोळ बाजारात साखर थेट पाच रुपयांनी महागलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधी फक्त 54 रुपयांना मिळत असलेली साखर आता थेट 59 रुपये किलोवर गेलेली आहे. यामुळेच पाच किलो साखर घेताना ही ग्राहकाला 25 रुपये जास्त मोजावे लागत आहे. दिवाळीच्या दिवसात साखरेची मागणी जास्त वाढली तर हेच दर थेट 60 रुपये पार जातील, असा सध्या अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. घाऊक बाजारात पाहिलं तर हीच स्थिती आहे. पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशननुसार घाऊक दर हा 52 रुपयांवरुन 54 रुपयांवर पोहोचलेला आहे. तर कारखान्यातून साखर ही 50 रुपये किलोने विकली जात आहे.

गेल्या वर्षी हा दर दिवाळीमध्ये फक्त 39 रुपये होता. दरवाढीमागे फक्त सणांची मागणी नाही. सध्या साखर उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे आणि उसातून रिकव्हरी यंदा तब्बल 10 टक्क्यांनी कमी झालेली आहे. त्यामुळे साखर पुरवठ्यावर दबाव आहे. तरीही ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय