31 ऑक्टो. 2026, 18:43

tarunbharat

सर्च
अर्थकारण

दिवाळी निमित्त सिलेंडरच्या किमतींचं नवं गणित!

दिवाळी निमित्त सिलेंडरच्या किमतींचं नवं गणित!
तरुण भारत

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लगबग वाढलेली आहे. फराळ, मिठाईपासून ते जेवणासाठी गॅस सिलेंडरची मागणी वाढली असताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. 28 ऑक्टोबर अर्थात आज जाहीर झालेल्या दरानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही,असे समोर आले आहे. दुसरीकडे 1 ऑक्टोबर रोजी 62.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे हॉटेल आणि मिठाई व्यावसायिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

नागपूर – घरगुती 993.50 रुपये, व्यावसायिक 2,988.50 रुपये

मुंबई – घरगुती सिलेंडर 941.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडर 2,764.50 रुपये

पुणे – घरगुती 945 रुपये, व्यावसायिक 2,825 रुपये

कोल्हापूर – घरगुती 944.50 रुपये, व्यावसायिक 2,788 रुपये

नाशिक – घरगुती 945.50 रुपये, व्यावसायिक 2,840.50 रुपये

छ. संभाजीनगर – घरगुती 950.50 रुपये, व्यावसायिक 2,869.50 रुपये

नांदेड – घरगुती 967.50 रुपये, व्यावसायिक 2,897 रुपये

अमरावती – घरगुती 975.50 रुपये, व्यावसायिक 2,924.50 रुपये

जळगाव – घरगुती 947.50 रुपये, व्यावसायिक 2,854 रुपये

अहिल्यानगर – घरगुती 955.50 रुपये, व्यावसायिक 2,855 रुपये

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय